पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, अनेकांचा मृत्यू, केंद्र सरकार काय करणार!

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये काल भीषण दहशतवादी हल्ला झाला. उन्हाळी सुट्टयांचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळ्या झाडल्या. जम्मू-काश्मीरमधील अलीकडच्या काही वर्षातील हा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला आहे. जवळपास 30 पर्यटकांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाल्याची शक्यता आहे. आतापर्यंत 16 लोकांची ओळख पटली असून त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. लोकांना धर्म विचारुन त्यांना ठार करण्यात आल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शीनी दिली. याच या हल्ल्याचे विविध फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. या हल्ल्यात कानपूरच्या शुभम द्विवेदी याचा अंत झाला आहे. लग्नांनंतर अवघ्या २ महिन्यात शुभम आणि ईशान्येचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या हल्ल्याच्या वेळी काय घडलं हे स्वतः ईशान्या आणि शुभम यांच्या भावांनी सांगितलं आहे.

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये डोंबिवलीमधील तिघे, पुण्यातील दोन व पनवेलमधील एका रहिवाशाचा समावेश आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तीन पर्यटकांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने हे तिघं मावस भावंड होते. संजय लेले हे शिंदे गटातील उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांचे मेव्हणे होते. संजय लेले हे आपल्या कुटुंबासोबत डोंबिवलीतील श्री विजयश्री हाउसिंग सोसायटीमध्ये वास्तव्याला होते. प्रवीण राऊळ हे संजय लेले यांचे जवळचे मित्र होते. संजय लेले सोबत आम्ही दोघ लहानपणापासून एकत्र मैदानात क्रिकेट खेळलो आहोत. प्रवीण राऊळ यांना अश्रू अनावर झाले. तर महाराष्ट्रातील अनेकजण अजूनही तिकडे अडकले आहेत. त्यांना सुरक्षित महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केलाआहे. ०२२-२२०२७९९० या क्रमांकावर पर्यटक किंवा त्यांचे नातेवाईक मदतीसाठी संपर्क साधू शकतात.

पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देश हादरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोद, अमित शाह तेथील परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच तिथे अडकलेल्या लोकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची सोय करणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पहलगाम हे काश्मीरमधील पर्यटन स्थळ आहे. इथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. काल दुपारी इथे मोठ्या संख्येने पर्यटक असताना हा दहशतवादी हल्ला झाला. पहलगामच्या सौंदर्याला काल रक्तरंजित करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा भारतात परतले आहेत. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यावर सोडून मायदेशी परतले आहेत. सौदी अरेबियावरुन परतताच पीएम मोदींनी विमानतळावर तातडीची बैठक घेतली. या बैठकीत एनएसए अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिव उपस्थित होते.

पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या घटलेली पाहायला मिळत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर श्रीनगरमधील दल लेक परिसराकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. दल लेक हा परिसर बोटींगसाठी आणि तेथील सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे पण. या हल्ल्यानंतर नेहमी गजबज असलेल्या या दल लेक परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याची भारतासह जगभरातल्या राष्ट्रांनी निंदा केली आहे. मात्र धर्म विचारून गोळ्या झाडल्याने संपूर्ण भारतात लोक रोष व्यक्त करत आहे. या भ्याड हल्ल्याने आतंकवादाचे विचार आणि त्यांचे मानसिकता दिसून येत आहे. हल्ला केलेल्या अतांकवादीला लवकरात लवकर साजा द्यावी आणि त्यांच्यावर लवकर कारवाई करावी अशी मागणीही देशातून होत आहे.

यानंतर आता केंद्र सरकार काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून असे हल्ले कधी थांबणार आणि या मानसिकतेच्या लोकांना कायद्याची भीती का वाटत नाही असा प्रश्न देखील उपस्थित होतोय. भारतातल्या सर्व लोकांना केंद्र सरकारकडून कारवाईची अपेक्षा आहे. पुलवामा अटॅकनंतर भारताकडून लवकरच कारवाई करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा तश्या कारवाईची लोकांना अपेक्षा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करणार याकडे लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *