राज्यासह देशात यंदा समाधानकारक पाऊस!

राज्यासह देशात यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याचे प्राथमिक अंदाज ‘स्कायमेट’ या अमेरिकेतील खासगी संस्थेने वर्तवला आहे. यावर्षी राज्यात मान्सूनचं प्रमाण कसं असणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे, या संदर्भात स्कायमेटचा एक रिपोर्ट आता समोर आला आहे. यावर्षी राज्यात पडणाऱ्या मान्सूनसंदर्भात स्कायमेटकडून पहिला पू्र्व अंदाज जारी करण्यात आला आहे. स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनची सुरुवात संथ गतीनं होईल. जूनमध्ये मान्सूनचं आगमन होईल, मात्र तो संथ गतीने पुढं सरकरणार आहे. मात्र त्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत देशभरात सरासरीच्या सुमारे १०३ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
‘स्कायमेट’तर्फे केलेल्या पहिल्या पूर्वानुमानामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम आणि दक्षिण भारतात समाधानकारक पाऊस होईल. पश्चिम घाटातील केरळ, कर्नाटक किनारपट्टी आणि गोवा या भागात अधिक पावसाची शक्यता आहे. मात्र, उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये आणि पर्वतीय भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, यंदा मोसमी पावसाचा दुसरा टप्पा (जुलै- ऑगस्ट) अधिक सक्रिय राहणार आहे. यामुळे जलसाठ्यांसाठी ही वेळ अनुकूल राहील, असल्याचंही म्हटलं आहे.
स्कायमेटने म्हटले आहे. जूनमध्ये सरासरी पावसाचा अंदाज ५० टक्के आहे. जुलैमध्ये ही शक्यता ६० टक्के इतकी आहे. ऑगस्टमध्ये सरासरी पावसाची शक्यता ४० टक्के आहे, तर सप्टेंबरमध्ये ६० टक्के इतकी आहे. ८९५ मिमी पावसाचा अंदाज आहे. देशात यंदा जून – सप्टेंबरदरम्यान सरासरी ८९५ मिमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या कालावधीत प्रामुख्याने देशात सरासरी ८६८ मिमी पाऊस पडतो.


सप्टेंबरमध्ये कोकण किनारपट्टीवर कमी


पाऊस भौगोलिक प्रदेशांबाबत वर्तवलेल्या अंदाजानुसार, केरळ, कर्नाटक, कोकण आणि गोवा या भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, कोकण किनारपट्टीवर सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
ला निना आणि एल निनोचा प्रभाव कमी
ला निना कमकुवत आणि कमी कालावधीसाठी असते. तसेच मोसमी पावसावर परिणाम करणाऱ्या अल निनोचीही फारसा प्रभाव जाणवणार नाही. ‘इंडियन ओशन डायपोल’ (आयओडी) आणि ‘एन्सो न्यूट्रल’ स्थितीमुळे मोसमी पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते, असे ‘स्कायमेट’ने म्हटले आहे.

स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार आसाम, अरुणाचल प्रदेश, आणि जम्मू -काश्मीरमध्ये यंदा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान यावर्षी पाऊस चांगला पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात देखील यंदा पावसाचं प्रमाण चांगलं राहणार आहे.

भौगोलिक प्रदेशांबाबत वर्तवलेल्या अंदाजानुसार, केरळ, कर्नाटक, कोकण आणि गोवा या भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, कोकण किनारपट्टीवर सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *