या तारखेला जमा होणार लाडकी बहिणींचं एप्रिलचा हप्ता

जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेचे 9 हफ्ते आत्तापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर एप्रिल महिन्याचे पैसे कधी मिळणार असा सवाल महिलांच्या मनात आहे. यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
महायुती सरकारची महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही काही ना काही कारणांमुळे सतत चर्चेत असते. त्या अंतर्गत पात्र ठरलेल्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी ही योजना गेमचेंजर ठरली. मागील तीन महिने पडताळणी ठप्प असल्याने सरकारला एप्रिलमध्ये पुन्हा 2 कोटी 47 लाख बहिणींना अनुदानाची रक्कम द्यावी लागणार आहे.
लाडकी बहिणी योजनेसाठी निवडणुकीपूर्वी महिलांचे सरसकट अर्ज स्वीकारताना त्यांच्या पडताळणीकडे कानाडोळा केला गेला. निवडणुकीपूर्वी 2 कोटी 34 लाख लाडक्या बहिणींना लाभ देण्यात आला. मात्र महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेतील अर्जांची पडताळणी केली जाईल, असे सांगितले. मात्र लाडक्या बहिणींची संख्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याची माहिती आहे.
जानेवारीत 5 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र ठरवून 2 कोटी 41 लाख महिलांना अनुदान वाटप करण्यात आले. मागील तीन महिने पडताळणी ठप्प असल्याने सरकारला एप्रिलमध्ये पुन्हा 2 कोटी 47 लाख बहिणींना अनुदानाची रक्कम द्यावी लागणार आहे.
एप्रिलचा हप्ता कधी मिळणार ?
एप्रिल महिन्यात 30 तारखेला अक्षय्य तृतीया असून त्याच मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार असल्याचे समजते.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे हे बँक खात्यावर टाकण्याकरिता सरकारला आत्ता प्रत्येक महिन्यात उशीर होत आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने एप्रिल महिन्याचा हप्ता 30 तारखेला महिलांच्या बँक खात्यात टाकण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार लाडकी बहिण योजनेचा हफ्ता प्रत्येक महिण्याच्या 8 तारखेला होणार असे सांगितलं गेले होते मात्र एप्रिलचा हफ्ता 30 तारखेला मिळणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र अर्जाची पडताळणी केली जाईल, असे राज्य सरकारकडून जानेवारीत जाहीर करण्यात आले होते. परंतु पडताळणीनंतर लाडक्या बहिणींची संख्या कमी होण्याऐवजी जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी आणि मार्चच्या लाभार्थीची संख्या वाढल्याचे समोर आले आहे.
तसेच ‘नमो’ शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थी 19 लाख 20 हजार आहेत. या दोन लाभार्थ्यांची संख्या वगळता जवळपास 60 ते 65 लाख अर्जांची पडताळणी अपेक्षित आहे. मात्र पडताळणी ठप्प असल्याने बहिणींची संख्या कमी होण्याऐवजी वाढत असून सरकारच्या तिजोरीवरील ताण वाढत आहे.
गेल्या वर्षी जुलैमध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील बहिणींच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले गेले. आतापर्यंत महिलांना नऊ महिन्यांचा लाभ देण्यात आला आहे.