भारताकडून पाकिस्तानवर राजकीय दबाव टाकत 5 मोठे निर्णय, पाकिस्तानला धक्का

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशय आहे. या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे.
भारताकडून पुन्हा एयरस्ट्राइक केली जाऊ शकते, असे पाकिस्तानला वाटतंय. पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. हे दहशतवादी पाकिस्तानमधून आल्याचे स्पष्ट झालंय. काल दिल्लीमध्ये एक महत्वपूर्ण बैठक झाली आणि पाकिस्तानविरोधात कडक पाऊले उचलली गेली. पाकिस्तानने भारतांच्या आरोपानंतर म्हटले की, आमचे या हल्ल्याशी काही देणे घेणे नाही. मात्र, तीन दहशतवादी पाकिस्तानमधून आल्याचे स्पष्ट झालंय.
भारताने पाकिस्तानवर राजकीय दबाव टाकत पाच मोठे निर्णय घेतले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती दिली आहे. भारत सरकारने जे निर्णय घेतले आहेत, त्यामुळे पाकिस्तानची कोंडी होणार आहे. पहलगाम इथं मंगळवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात 27 जणांना आपला जीव गमवाला लागला होता.
भारत सरकारचे 5 मोठे निर्णय
- सिंधु पाणी करार स्थगित
- पाकिस्तानी नागरिकांसाठी भारतीय व्हिसा बंद
- पाकिस्तानी दुतावासांना भारत सोडण्याचे आदेश
- अटारी वाघा बॉर्डर १ मे पर्यंत बंद राहाणार
- भारतातील पाकिस्तानी उच्चायोग बंद
भारताने पाकिस्तानवर राजकीय सर्जिकल स्ट्राईक केला आहे. त्यानुसार भारताने सिंधु पाणी कराराला स्थगिती दिली आहे. त्यामुळे करारानुसार भारतातून पाकिस्तानला सोडलं जाणारं पाणी आता रोखलं आहे. त्याचा थेट फटका पाकिस्तानला बसला आहे. या पाण्यावर पाकिस्तानची शेती अवलंबून आहे. कापड उद्योगालाही हेच पाणी मिळत असतं
आता पाकिस्तानच्या लोकांची आणि शेतीची अवस्था वाईट होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानी नागरिकांना भारतीय व्हिसा देण्यात येणार नाही. जे पाकिस्तानी नागरिक भारतात आहेत त्यांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानी दुतावासातील अधिकाऱ्यांनाही भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतातील पाकिस्तानी उच्चायोग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच बरोबर अटारी वाघा बॉर्डर ही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 मे पर्यंत ही बॉर्डर बंद राहील. जे भारतीय पाकिस्तानात आहेत त्यांनी भारतात यावं असे आदेश ही देण्यात आले आहेत. तर, भारताने आजपासून पाकिस्तानी नागरिकांनी देण्यात येणारी व्हिसा सेवा बंद केली आहे. सध्यस्थितीतील वैध व्हिसा २७ एप्रिलपर्यंत वैध राहतील, तर वैद्यकीय व्हिसा २९ एप्रिलपर्यंत वैध राहणार आहेत. व्हिसा अवैध ठरण्याआधीच पाकिस्तानी नागरिकांनी भारत देश सोडण्याचे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.
यानंतर आता पाकिस्तानला मोठा महसूल देणारी भारत आणि पाकिस्तानमधील अटारी-वाघा सीमा बंद करण्यात आली आहे. सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याचे आणि ४८ तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. अनेक उच्च सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे की भारत आता पाकिस्तानला होणाऱ्या वस्तूंची निर्यात थांबवण्याची तयारी करत आहे.
भारताकडून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पाकिस्तानकडून देखील आता थयथयाट सुरू करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. भारताने पाकिस्तानची कायदेशीर मार्गाने गोची करत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, भारताच्या निर्णयांनंतर आता पाकिस्तानकडून देखील भारताविरोधात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पाकिस्तानकरता सिंधु जल वाटप करार स्थगित करण्याचा भारताने निर्णय घेतल्या नंतर पाकिस्तानमध्ये आज त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक झाली. या बैठकीनंतर पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर देत काही निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले.
- पाकिस्तानकडून भाराताला लागून असलेली अटारी बॉर्डर
बंद - भारतासोबतच्या व्यापारावर पाकिस्तानकडून बंदी घातली
- पाकिस्तानात असलेल्या भारताच्या राजदुतांनी 30
एप्रिलपर्यंत भारतात परतावं - पाकिस्तानने त्यांचे हवाईक्षेत्र भारतासाठी केले बंद
पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने एकामागून एक बैठका घेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. पाकिस्तानविरोधात कडक भूमिका घेतली असून, कठोर कारवाईचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यानंतर तिळपापड झालेल्या पाकिस्ताननेही भारताविरोधात निर्णयांची घोषणा केली.