पहलगाम हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शाह ॲक्शनमध्ये, मोठं घडणार?

जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन परदेशी नागरिक देखील होते. दरम्यान या हल्ल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे, काही तरी मोठं घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

सरकारकडून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली.

22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममधील बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका नेपाळी नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील हा सर्वात घातक हल्ला आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना टीआरएफचा हात आहे. आता याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलयला सुरुवात केली आहे. यामध्ये 1960 चा सिंधू पाणी करार स्थगित करणे, अटारी-वाघा सीमा क्रॉसिंग बंद करणे, पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांना नवी दिल्लीतून हाकलून लावणे आणि सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणे यांचा समावेश आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे, सिंंधु नदी पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे. तसेच अटारी बॉडर देखील बंद करण्यात आली आहे. सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आज अमित शाह यांनी राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली, या बैठकीत राज्यातील पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत, यादी समोर आल्यानंतर सर्वांना बाहेर काढा असा आदेश अमित शाह यांनी दिला आहे. लष्कर प्रमुखांनी देखील नियंत्रण रेषवरील परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

भारताचे गृहमंत्री अमित शाहांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांची यादी तयार करून ती केंद्र सरकारला पाठवण्यास सांगितले आहे. सरकारने आधीच जाहीर केले आहे की, पाकिस्तानी नागरिकांचे सर्व व्हिसा 27 एप्रिल 2025 पासून रद्द केले जातील, तर वैद्यकीय व्हिसा 29 एप्रिल 2025 पर्यंत वैध राहतील. याशिवाय, भारतीय नागरिकांना शक्य तितक्या लवकर पाकिस्तानातून परतण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. अमित शहांनी सर्व मुख्यमंत्र्यांना या कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आणि आपापल्या राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांचे व्हिसा रद्द करण्याच्या प्रक्रियेत कोणताही विलंब होऊ नये, असेही त्यांनी सांगितले. पाकिस्तानने भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घातली आहे, तसेच पाकिस्तानच्या बाजुची वाघा बॉर्डर देखील आता बंद करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीरमधून परतताच शुक्रवारी राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यानंतर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन संवाद साधला.

पहलगाम हल्ल्याबद्दल माहिती देतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना शोधण्याचे निर्देश दिले. भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना शोधून त्यांना तातडीने परत पाठवा, असे शाह यांनी सांगितले. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसाही रद्द करण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. यात सिंधू जल करार स्थगित करण्याचाही निर्णय घेण्यात आला. भारत-पाकिस्तान यांच्यात १९६० मध्ये सिंधू जल करार लागू करण्यात आला होता.

सिंधू नदीलाच पाकिस्तानची जीवनवाहिनी म्हटले जाते. २१ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येला पाणी पुरवण्याचे काम सिंधू नदी आणि तिच्या चार उपनद्यांच्या माध्यमातून होते. मात्र भारत सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे पाकिस्तानला फटका बसला आहे.

अमित शाह यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढा अशा सूचना अमित शाह यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना या बैठकीमध्ये दिल्या आहेत. अमित शाह यांनी बैठकींचा सपाटा लावला आहे. त्यामुळे आता काहीतरी मोठं घडणार असल्याची चर्चा सुरू  आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *